24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

खरेदी विक्री संघाला कंपन्यांनी वेळेत खत पुरवठा करावा

जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांच्या सूचना ; कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ चेअरमन व गटसचिव खरीब हंगाम आढावा बैठक

कणकवली | मयुर ठाकूर : धोरणानुसार सर्व विकास संस्थांनी खत विक्री लायसन व पॉज मशीन वर खत विक्री केली पाहिजे. मात्र लायसन्स साठी बीएसी प्रतिनिधी आवश्यक ही अट सोसायट्यांना ठेवणे शक्य नाही. तरी देखील ज्या संस्थाना शक्य आहे त्यांनी लायसन्स अपडेट करावीत. खतपुरवठा संबंधित कंपन्यांनी वेळेत शेतकरी खरेदी विक्री संघाला करावा तरच गावागावात शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर खत पुरवठा करण्यात येईल अशा सूचना जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांनी दिला यांनी दिला.

वागदे येथील हॉटेल विश्रांती येथे रविवारी कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ चेअरमन व गटसचिव खरीब हंगाम आढावा बैठक पार पडली.या बैठकीला शेतकरी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रकाश सावंत,व्हा.चेअरमन सुरेश ढवळ, सिंधुदुर्ग गुणवत्ता निरीक्षक संभाजी शेंनवे,तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे,संचालक संजय शिरसाट, विनिता बुचडे, प्रशांत सावंत,रघुनाथ राणे, पंढरी वायगणकर,अतुल दळवी,लीना परब,स्मिता पावसकर आदी संचालक व तालुक्यातील संस्था चेअरमन व सचिव उपस्थित आहे.

चेअरमन प्रकाश सावंत म्हणाले,विकास संस्थांनी लायसन्स नव्याने काढा,ज्यांचे नूतनीकरण नाही,त्यांनी नूतनीकरण करावे.शेवटी खत पुरवठा संघ करतो,मात्र आमच्यासमोर अडचणी येतात.त्यासाठी आम्ही जनजागृती केली आहे,खत विक्री लायसन्स काढावेत,सर्वांनी मनावर घ्यावे. खत विक्री करताना पॉज मशीन चा वापर करणे आवश्यक आहे.खतांची मागणी आवश्यकतेनुसार करा.अन्यथा,संघाला भुर्दंड पडतो,पैसे अडकून पडतात.त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी पाहून खत मागणी करा.

तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, पाऊस वेळेवर होईल,त्यानुसार नियोजन आवश्यक आहे.भात बियाणे विक्री करण्यापूर्वी स्वतः टेस्ट करा.सेंद्रिय शेती,नैसर्गिक शेती करण्याची गरज आहे. युरिया सारखी खते जमिनीवर मारून आरोग्यावर परिणाम होत आहे.रासायनिक खते वापरणायपेक्षा सेंद्रिय खते शेतकऱ्यांना दिली पाहिजेत.जमिनीचा कस वाढण्यासाठी सेंद्रिय खतांची वापर केला पाहिजे.खते वाटप करताना सम प्रमाणात केलं पाहिजे.

संभाजी शेनवे म्हणाले,हवामानाचा अंदाज घेवून खरिब नियोजन केलं जात आहे.यावर्षी १०० टक्के पाऊस आहे,वेळेत खत व्यवस्थापन करण्याची गरज आहे.आपण लायसन्स नूतनीकरण केलं का? पहायला पाहिजे.आमच्या तपासणीत लायसन्स रद्द झालेलं आढल्यास कारवाई होईल.ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया लायसन्स आहे,तरी त्या संस्थांनी खत आणि बियाणे विक्री करणासापूर्वी लायसन्स घेतली पाहिजेत.जगात खत उत्पादनात ३ नंबर देश आपला आहे.तर खत वापरत आपला देश दुसऱ्या क्रमांकावर आहे.रासायनिक खते वापरून आपले नुकसान करीत आहोत.नॅनो युरिया वापर करण्यासाठी जनजागृती करा.रासायनिक खताचा वापर कमी करताना सेंद्रिय खते वापरण्याची गरज आहे.बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीकडून कालावधी घ्यावा, शेतकऱ्यांची फसवणूक होता गामा नये.महाबीज चे बियाणे वापरावे.

यावेळी संघांचे सहाय्यक व्यवस्थापक राजेंद्र सावंत, कविता राणे, संदीप तोरस्कर वाळवे, सायली लाडगांवकर इकाळे, करुणा घाडीगावकर, किशोर राऊत उपस्थित होते.या बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संघाचे व्यवस्थापक गणेश तावडे यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!