कणकवली : कणकवली तालुक्यातील जानवली-गावठणवाडी पिकअप शेड येथे रविवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास डस्टर गाडी नंबर (एमएच ०३ बीएस ४४८०) ची जोरदार धडक बसून मंगला जाधव (वय, ७०) रा. जानवली-गावठणवाडी व शरदचंद्र जाधव वय, ४७ हे दोनजण गंभीर जखमी झाले होते. तर शरदचंद्र जाधव यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी कणकवली येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर मंगला जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सदर अपघातातील चालक धडक देऊन पसार झाला होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने कार चालकाला पकडण्यात यश आले. यावेळी कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल सचिन माने व पोलिस अंमलदार पांडुरंग कळंत्रे यांनी सदर कार ताब्यात घेतली. त्यानंतर कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे व पोलिस कॉन्स्टेबल किरण कदम यांनी फोंडा येथे जात सदर कार व चालक यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
याबाबत फिर्यादित आनंद बाबी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादित असे म्हटले आहे की, रविवारी सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास डस्टर गाडी चालक वेदांत जयवंत शेलार रा. पारगाव, कोल्हापूर (वय,२५) याने आपल्या ताब्यातील डस्टर गाडी भरधाव वेगात चालवून मंगला जाधव व शरदचंद्र जाधव यांना जोरदार ठोकर देऊन अपघात करून निघून गेला. याप्रकरणी कार चालक वेदांत जयवंत शेलार याच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात कलम ३०४(ए), २७९, ३३७, ३३८, एमव्ही अॅक्ट १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलिस ठाण्याच्या महिला पोलिव उपनिरीक्षक वृषाली बरगे करीत आहेत.