संपादक | मयुर ठाकूर : उन्हाळी कालावधीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनातर्फे कोकण रेल्वे मार्गावर एलटीटी थिविम एलटीटी अशा दोन विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या मध्य रेल्वेच्या समन्वयाने धावणार आहेत. यापूर्वीच एलटीटी कोचुवेली – एलटीटी, उधना मेंगलोर – उधना अशा दोन विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली असून आता आणखी दोन गाड्यांची घोषणा झाल्याने प्रवाशांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.
एलटीटी थिविम (०११८७) १८ एप्रिल ते ६ जून या कालावधीत दर गुरुवारी रात्री १०.१५ वाजता एलटीटी येथून सुटेल व सकाळी ९.५० वाजता थिविम येथे पोहोचेल. थिविम एलटीटी (०११८८) १९ एप्रिल ते ७ जून या कालावधीत दर शुक्रवारी सायंकाळी ४.३५ वाजता थिविम येथून सुटेल व पहाटे ३.४५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
एलटीटी थिविम (०११२९) २० एप्रिल ते ८ जून या कालावधीत दर शनिवारी रात्री १०.१५ वाजता एलटीटी येथून सुटेल व सकाळी ९.५० वाजता थिविम येथे पोहोचेल. थिविम एलटीटी (०११३०) २१ एप्रिल ते ९ जून या कालावधीत दर रविवारी सायंकाळी ४.३५ वाजता थिविम येथून सुटेल व पहाटे ३.४५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
या दोन्ही गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी या स्थानकांवर थांबा असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.