चारचाकींचे लाखोंचे नुकसान
कणकवली : तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथे शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आंब्याच्या झाडाची फांदी पार्किंग केलेल्या तीन चारचाकी गाड्यांवर कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिन्ही चारचाकींचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या मध्ये अल्टो, अर्टिगा आणी वॅगनआर गाड्यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच कलमठ सरपंच संदीप मेस्त्री व भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच तात्काळ पिडब्ल्यूडी च्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. तात्काळ कटर मशीन च्या साहाय्याने चारचाकी गाड्यांवर कोसळलेल्या झाडांची फांदी बाजूला करण्याचे काम सुरू केले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.