3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच कणकवलीत जल्लोष

कणकवली | मयुर ठाकूर : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची यांनी शपथ घेताच कणकवलीत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. तसेच उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही शपथ घेतली. यामुळे कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांकडुन जोरदार घोषणाबाजी करत, पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला.

महायुतीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देवेंद्र फडणवीस साहेब आगे हम तुम्हारे साथ है.. एकनाथ शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. अजितदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.. नारायण राणे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है… रविंद्र चव्हाण साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है.. भारत माताकी जय.. अशा जोरदार घोषणा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी देत राज्यात सरकार आल्याचा जल्लोष केला.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, तालुका सरचिटणीस बबलू सावंत, विजय चिंदरकर, सागर राणे, अभय गावकर, नंदू वाळके, चानी जाधव, प्रसाद देसाई, गणेश तळवडेकर, सुदेश देसाई, अभय राणे, गणेश तळगावकर, युवा मोर्चा जिल्हाचिटणीस सागर राणे, शहर अध्यक्ष युवा मोर्चा मंदार सोगम, पप्पू यादव, अवधूत तळगावकर, आशिष वालावलकर, ऋत्विक राणे आदींसह भाजपा व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!