22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

नाटळ मारहाण प्रकरण | … यांच्यावर झाले गुन्हे दाखल

कणकवली : तालुक्यातील नाटळ येथे सोमवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये काही कामांवरून हमरातुमरी झाली व सदरचे प्रकरण हाणामारी पर्यंत पोहोचले. दरम्यान या हाणामारी मध्ये काही जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन गटांमध्ये झालेल्या या हाणामारीत काही जणांच्या डोक्याला तर काहींच्या हाता – पायाला गंभीर दुखापती झाल्याने त्यांना येथील कणकवली उपजिल्हा रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी झालेल्या मारहाणीत ग्रामपंचायतमधील खुर्च्यांची मोठ्याप्रमाणात मोडतोड झाली. नाटळ येथील हाणामारी ची माहिती समजताच दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. सदरची घटना ही सोमवारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

दिनानाथ पंढरीनाथ सावंत ( वय ६६ ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, ग्रामपंचायत येथे आयोजित केलेली ग्रामसभा ही तहकूब करण्यात आली. यावेळी मागील काही प्रश्न घेऊन संशयित आरोपी गणेश मारुती सावंत, ऋषिकेश मारुती सावंत, प्रीमेन चोडणकर हे सरपंचांच्या अंगावर धावून गेले. यावेळी दिनानाथ सावंत हे गणेश मारुती सावंत, ऋषिकेश मारुती सावंत, प्रीमेन चोडणकर यांना अडविण्यासाठी गेले असता, दीनानाथ सावंत यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच यावेळी गणेश सावंत यांनी धारदार चाकु काढून दिनानाथ सावंत यांच्या डोक्याच्या मागील बाजूस मारला, असे दिनानाथ सावंत यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

दिनानाथ सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी गणेश मारुती सावंत, ऋषिकेश मारुती सावंत, प्रीमेन चोडणकर, रमाकांत घाडीगांवकर, पद्माकर गणेश पांगम, सचिन पांडुरंग सावंत, अविषण श्यामराव सावंत, सतीश संतोष जाधव, पांढरी हरी पांगम, समर्थ श्यामराव सावंत ( सर्व राहणार नाटळ ) यांच्यावर भादवी कलम ३०७, ३२४, ३५२, ५०४, १४३, १४७, १४८, ४४९, बॉम्बे ॲक्ट ३७, १३५ नुसार गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे

घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार हा मागील काही जुन्या वादातून झाला अशी चर्चा सुरू आहे. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

यावेळी घटनेची माहिती मिळताच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, स्वप्नील चिंदरकर, सचिन पारधीये, प्रज्वल वर्दम, संदीप सावंत, आदींनी धाव घेतली. तसेच घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आढाव, कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, सचिन हुंदळेकर, विनोद चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचारी देखील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!