28.4 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

फोंडाघाट येथील अपघात प्रकरणी खाजगी बस चालकावर गुन्हा दाखल

चौघे जखमी ; खाजगी बस चालकावर गुन्हा दाखल

कणकवली : गुन्हे अन्वेषण विभागाची कोल्हापूर येथे मीटिंग असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्गचे तृप्ती मुळीक, पाडळकर, कदम, निवतकर हे सरकारी वाहन क्रमांक ( एमएच ०७ जी २२४२ ) घेऊन सिंधुदुर्गहून राधानगरी मार्गे कोल्हापूरच्या दिशेनेबजात असताना फोंडाघाट पूनम हॉटेल पुढे उजवीकडील मोठ्या वळणावर इंटरसिटी खाजगी बस ( एमएच ०४ केयु ०७१६ ) या गाडीची जोरदार धडक बसून अपघात झाला. हा अपघात सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. याप्रकरणी कृष्णकांत प्रभाकर कदम (५४) यांच्या फिर्यादीवरून इंटरसिटी खाजगी बस चालक प्रेमराम किशोर सिंग ( वय – ३६ रा. नगलामहू, तालुका- बचेडी, भैलपूर, राजस्थान ) याच्यावर भरधाव वेग व अविचाराने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी इंटरसिटी खाजगी बस चालकावर भा.द.वि.कलम २७९, ३३७, ३३८, एमव्ही ऍक्ट १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंधुदुर्ग गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी हे कोल्हापूर येथे कार्यालयीन मिटिंगसाठी जात असताना फोंडाघात येथे पूनम हॉटेल नजीकच्या तीव्र वळणावर समोरून येणाऱ्या इंटरसिटी खाजगी बस ची धडक बसून अपघात झाला. या अपघातात गुन्हे अन्वेषण विभागाचे तृप्ती मुळीक, पाडळकर, कदम, निवतकर जखमी झाले. काहींच्या हातापायाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. यावेळी फोंडाघाट येथील चेतन चायनीज सेंटर चे मालक ओंकार विठ्ठल पिळणकर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी फोंडाघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रथमोपचारानंतर सर्व जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!