29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

जाणवली येथे दुसऱ्यांदा अज्ञात वाहनची धडक बसून अपघात | पादचाऱ्याचा मृत्यू

कणकवली : मुंबई व महामार्गावर जाणवली प्राथमिक शाळेसमोर चालत असलेल्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत पादचारी जागीच गतप्राण झाले. वाहनाची धडक एवढी जबरदस्त होती की, त्या वाहनाच्या पुढील बाजूस असलेला बंपर तुटून पडला. व्यक्तीची ओळख पटली नसली तरी सदर व्यक्ती मजुरी चे काम करण्यासाठी जात असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ज्या गाडीने धडक दिली ती कार प्रवासी वाहतूक करणारी पिवळ्या रंगाची नंबर प्लेट असलेली आहे. तर सदरची कार ही भरधाव वेगाने गोव्याच्या दिशेने निघून गेली.

एकूणच जर पाहिलं तर त्याच ठिकाणी अज्ञात वाहनाची धडक बसून अपघात होणं ही दुसरी घटना आहे. तेथील वास्तव पाहायला गेलं तर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तेथील घटना पाहायला मिळत नाही. मात्र त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मागणी होऊ लागली आहे. पोलीस यंत्रणेने देखील याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!