24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

मतदारांना पैसे वाटप | परशुराम उपकरांच्या तक्रारीची EC ने घेतली दखल ; चौकशीचे आदेश

कणकवली : रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नारायण तातू राणे यांनी केले आहे. आचारसंहितेचे उल्लंघन म्हणजे मतदारांना लाच देणे, मतदारांना धमकावणे इ. आम्हांला मिळालेल्या व्हिडीओ पुराव्यानुसार तक्रार माजी आमदार परशुराम उपरकर यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार भारत निवडणूक आयोग निर्वचन सदन, यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नारायण तातू राणे आणि ईव्हीएम मशिनवर कोणत्या चिन्हावर मतदान करायचे तेही दाखवले. व्हिडीओ पुरावा गाव – फोंडा, तालुका – कणकवली, जिल्हा – सिंधुदुर्ग येथील आहे. व्हिडिओनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया ही तक्रार स्वीकारा आणि उमेदवार आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी उपरकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे केली आहे. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने तत्परतेने ऑनलाइन मेल उपरकर यांना पाठवत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत असा रिप्लाय त्यांना देण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!