29.7 C
New York
Tuesday, June 18, 2024

Buy now

किरण सामंत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर | तीनही विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने करणार पदाधिकाऱ्यांशी चर्चा

सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : सिंधुरत्न योजना सदस्य तसेच शिवसेना नेते किरण सामंत हे उद्या १८ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. पुढील काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुका संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात निवडणुकांना सामोरे जाण्यासंदर्भात प्रत्येक तालुक्यातील शाखाप्रमुख, बूथ प्रमुख, विभागप्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्या सोबत चर्चा तसेच गाव निहाय दौऱ्याचे नियोजन या दौऱ्या मध्ये करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीतील घडामोडी नंतर किरण सामंत यांचा हा पाहिलाच जाहीर दौरा आहे. त्यामुळे सर्वांचे या दौऱ्या कडे लक्ष लागले आहे.

उद्या सायंकाळी ४ वाजता किरण सामंत शिवसेना कार्यालय कणकवली येथे दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या सर्व विधानसभा प्रमुख, जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, तसेच सर्व उपजिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, तालुका समन्वयक, जिल्हा संघटक, या सर्व पुरूष व महिला पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना  जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!