23.2 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

एक दिवस छोट्या दोस्तांचा | २६ मे रोजी होणार स्पर्धा आंबे खाण्याची ; युवा संदेश प्रतिष्ठान चे आयोजन

कणकवली | मयुर ठाकूर : युवा संदेश प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षी असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना, लहान मुलांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते. तशीच एक स्पर्धा म्हणजे आंबे खाण्याची स्पर्धा.! यावर्षी होणार आहे.

नाटळ व हरकुल जि. प. मतदारसंघ मर्यादित रविवार दिनांक २६ मे २०२४ रोजी एक दिवस छोट्या दोस्तांचा सकाळी ९ ते १२ यावेळेत जिल्हा परिषद शाळा कनेडी बाजारपेठ सांगवे येथे होणार आहे.

शैक्षणिक साहित्य स्वरूपात असणार बक्षिसांची खैरात!

आंबे खाण्याच्या स्पर्धेला पहिला गट हा अंगणवाडी ते तिसरी असा असणार असून पाहिले बक्षीस १५००/-, दुसरे बक्षीस १०००/-, तिसरे बक्षीस ७००/- तसेच दुसऱ्या गटात चौथी ते सातवी असे विद्यार्थी असणार आहेत. दुसऱ्या गटासाठी पाहिले बक्षीस २५००/-, दुसरे बक्षीस १५००/-, तिसरे बक्षीस १०००/- असे असणार आहे.

त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी २४ मे २०२४ पर्यंत ९४२३३११०७९, ९४२२५६५२८०, ९४२०२०६३२६, ९४२१२६६७५१ या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. यादरम्यान मनोरंजक खेळ आणि जादूचे प्रयोग देखील होणार आहेत. उपस्थित सर्व लहान मुलांना लकी ड्रॉ चे मोफत कूपन देखील मिळणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!