भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचा टोला
कणकवली | मयुर ठाकूर : राणे साहेब यांनी मुलांना जर्मनीत पाठवावे असे नाईक म्हणत असतील तर नारायण राणे यांची मुल उच्चशिक्षित आहेत ती पण परदेशात शिकून आली आहेत. परंतु नाईक यांच्या वडिलांनी म्हणजे कै विजयराव यांनी मोठ्या आशेने आपल्या मुलाला कोल्हापूर मध्ये टाकले. तिकडे जाऊन काय दिवे लावलात. कॉलेज शिक्षण पूर्ण न करता वैभव नाईक हे मागे आले. शिक्षणाचे ‘वैभव’ कणकवली ला आणले याचे वैभव नाईक यांनी आत्मपरीक्षण करावे. जर्मनी चे स्पेलिंग वैभव नाईक यांनी बघून म्हणून दाखवावे (ते सुध्दा त्यांना अवघड पडेल) अशा वैभव नाईक यांनी आपले ठेवावे झाकून अशी परिस्थीती आहे याचा विचार टीका करताना ठेवावा. अगदी ताजे उदाहरार्थ मनसे चे अविनाश जाधव येऊन सांगून गेले की फक्त बेस्ट मध्ये ७५०० नोकऱ्या राणे साहेब यांनी कोंकणी माणसाला दिल्या. त्यांच्या मुलांच्या नावावर तर नोकरी उपलब्ध करून देण्याचे जागतिक रेकॉर्ड आहे हे सोयीस्कर पणे नाईक विसरले आहेत. तेव्हा अजूनही मातोश्री कडे गूळ लावण्यासाठी पत्रकार परिषदा घेऊन आपली लाल करून घेऊ नये ही त्यांना सूचना आहे. सी वर्ल्ड व विमानतळाला सुरुवातीला नाईक यांनी विरोध केला होता. कुडाळ मालवण मध्ये आमदार असताना नाईक यांनी काय रोजगार आणला. येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांचे पार्सल निलेश राणे आरोंद्याला पाठवतील असा टोला देखील मिलिंद मेस्त्री यांनी लगावला.