22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांचा कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत

प्रतिदिवशी असंख्य कार्यकर्ते दाखल होत आहेत भाजपात

भाजप प्रवेशाचा शिलशिला सुरूच

कणकवली | मयुर ठाकूर : देवगड तालुक्यातील दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनंत अनभवणे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत ओम गणेश निवासस्थानी कणकवली येथे भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी सरपंच श्रीकृष्ण अनभवणे व त्यांच्या समवेत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.

यावेळी दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांच्या समवेत प्रदीप कुळकर, विनायक तेली, नरेश कुळकर, संदीप कुळकर, विवेक कुळकर, वसंत मालपेकर, पंकज कुळकर, किशोर चव्हाण, राजेश राऊळ, सुरज धुरी, गोपाळ मुळेये, विनायक राऊत,मनोहर राऊत, रवींद्र राऊत,ज्ञानेश्वर राऊत,संदीप राऊत, संतोष राऊत, राजेंद्र राऊत,जयेश थोटम, पप्या घाडी आदींनी प्रवेश केला.

या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, नंदू देसाई,प्रदीप देसाई, शशिकांत गोठणकर, पिंटू लाड गावकर,उमेश गोठणकर आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

कणकवली मतदारसंघाचा विकास आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.या विकास प्रक्रियेत दाभोळे गावाचा ही सहभाग असावा यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश केलेला आहे. महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होत आहे.कोकण चा विकास होत आहे. त्यामुळेच नामदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आणि पक्षप्रवेश करत असल्याचे सरपंच अनभवाने यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!