कणकवली : विजयादशमीच्या पूर्वसंध्येला शिवरायांच्या महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन मुस्लिम धर्मियातील काही समाज कंटकांकडून अडविण्याचा प्रयत्न झाला, या पध्दतीने हिंदू धर्मियांच्या सण उत्सव काळातील समाज कंटकांकडून चुकीच्या घोषणा बाजी किंवा अडवण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. रत्नागिरी येथे झालेल्या घटेनेच सकल हिंदू समाजाच्यावतीने आम्ही निषेध करतो. असे निवेदन कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांना सकल हिंदू समाजाच्यावतीने देण्यात आले. हिंदू समाजाच्यावतीने यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी वंदे मातरम्, हिंदूओं का हिंदू देश, मेरा देश मेरी मिठ्ठी, भारत मे रहना है, तो वंदे मातरम् कहना होगा, भारत माता की जय, एक ही नारा एक नाम.. जयश्री राम जयश्री राम यासह विविध घोषणा हिंदू समाज कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या .
कणकवली तहसिलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात, कणकवली येथील समग्र हिंदू समाजातर्फे देण्यात येत आहे. विजयादशमीच्या पुर्वसंध्येला रत्नागिरी शहरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन पुर्व परवानगी घेऊन शांतपणे व शिस्तबद्ध रीतीने निघाले होते. हे संचलन कोकणनगर भागात आल्यानंतर तेथे अगोदरच येऊन राहिलेल्या मोठ्या जमावाने ते रोखण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचारी तेथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते. परंतु त्यांनी वेळीच तेथे जमलेल्या जमावाला बाजूला करण्याची गरज होती. मात्र, त्या जमावाने ‘नारा-ए-तकबीर’ ‘अल्लाहू अकबर’ अशा जोरदार घोषणा देत तणाव निर्माण केला. ही घटना निषेधार्ह आहे. त्यावेळी पोलीस मुक्याची भूमिका घेऊन उभे असल्याने त्या जमावाची हिंमत वाढली आणि त्यांनी अल्लाहू अकबरच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देऊन आक्रमक रूप धारण केले आणि शांततेने चालणा-या पथसंचलनाच्या मार्गाचा काही भाग बेकायदेशीरपणे अडवून धरला. यामुळे तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समजूतीचे धोरण स्वीकारून त्या बेकायदेशीर जमावाला वळसा घालून आपले संचलन शांततामय रीतीने पुढे चालू ठेवले व नियोजित ठिकाणी त्याची सांगता केली. परंतु या सर्वामुळे आम्हा हिंदू बंधू भगिनींच्या मनामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये दसर्यानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे काढण्यात येणा-या या पथसंचलनामध्ये अडथळा करण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. तरीसुद्धा मुस्लिम धर्मियातील काही समाज कंटकांकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि मुद्दामहून उकसवण्याच्या इराद्याने उद्दामपणाने तो प्रकार घडला. यातील रत्नागिरी पोलिसांची भूमिका ही अत्यंत आक्षेपार्ह आहे. प्रत्यक्ष हाणामारी घड्डू दिली नाही याचे क्रेडिट घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. कणकवली शहरांमध्ये सध्या जाळीदार टोपी घातलेले अनेक अनोळखी तरुण युवक तसेच बुरखावेशधारी मोठ्या प्रमाणामध्ये फिरताना दिसत आहेत. त्यांच्या हालचालींवर लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. सध्याची सामाजिक स्थिती अत्यंत संवेदनशील झालेली आहे. विशेषतः मुंबईतील इम्तियाज जलील यांच्या लाखोंच्या मोर्चानंतर आणि त्यातील आक्षेपार्ह घोषणानंतर समाजामध्ये एक प्रकारचा तणाव जाणवत आहे. अन्य धर्मीयांच्या उत्सवामध्ये हिंदू धर्मीय युवक चाल करून गेले किंवा तेथे काही बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे घडलेले नाही. उलट पक्षी दरवर्षीप्रमाणे निघणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाला टारगेट करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केलेला आहे. सध्या हिंदू धर्मियांचे अनेक सण, उत्सव, यात्रा, देवाच्या पालख्या सुरु होत आहेत व पुढेही होणा- या आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील हिंदू समाज मोठयाप्रमाणामध्ये सामील होणारा आहे. हिंदू धर्मियांच्या या उत्सवामध्ये हेतूपुरस्सर विघ्न निर्माण करुन सामाजीक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न काही समाज कंटकांकडून होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आपण चहुबाजुने जागृत राहुन अशा घटना भविष्यात घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. अशी मागणी कणकवली तहसिलदारांकडे करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संजय पाताडे, विश्वहिंदू परिषदेचे रविंद्र तांबोळकर, सखाराम सकपाळ, मृणाल ठाकुर, राजश्री धुमाळे, गीतांजली कामत, प्रतिभा करंबेळकर, अनघा चिपळूणकर, संपदा प्रभुदेसाई, डॉ. वैशाली कोरगांवकर, वर्षा बेळेकर, प्रभाकर सावंत, प्रकाश करंबळेकर, कमलाकर पाटील विठोबा कांदळकर, हरिश गणपत्ये, नितीन पटेल, दत्तात्रय मुंडले, आनंद चिपळूकर, मिलींद बेळेकर, महेश सापळे, नरोत्तम पटेल, दिपक पटेल, गौरी वाळके, मीरा पावसकर, सुरेखा महाजन, माधुरी म्हसकर, पौर्णिमा म्हसकर, उल्का जोशी, रुचिरा वर्णे, अश्विनी वायंगणकर, हेमा पटेल, रुपाली तळवडेकर, निलेश माणगांवकर, जितेंद्र चिकोडी, बळीराम पवार, विश्राम राणे, नांदगांव सरपंच भाई मोरजकर, पंढरी वायंगणकर, सुभाष बिडये, प्रदिप हरमलकर, यशवंत सदडेकर , पपी सापळे, ऋषिकेश मोरजकर, विठोबा कांदळकर, श्रीराम मोरजकर, कृष्णा वायंगणकर, मिलींद मेस्त्री, संदीप राणे, पप्पू पुजारे, सदानंद चव्हाण, लक्ष्मण घाडीगांवकर, समीर प्रभुगांवकर, बँक संचालक समीर सावंत, कमलेश पाटील आदींसह विविध हिंदूत्वादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.