1.6 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

वागदे येथे दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी | गोवा बांबोळी येथे उपचारासाठी हलविले

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर वागदे डंगळवाडी पिकअपशेडजवळ हिरोहोंडा डिलक्स (क्र.एमएच०७ एम ९४१४) मोटरसायकल अपघात होऊन मोटरसायकल चालक धिरज भुजबळकर हा जखमी झाला. त्याच्यावर ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून त्याला गोवा-बांबुळी येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. १३ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३० वा.च्या सुमारास हा अपघात घडला.

याबाबतची फिर्याद गोपाळ महादेव काणेकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. हिरोहोंडा कंपनीची डिलक्स ही मोटरसायकल (गाडी नं. एमएच ०७ एम ९४१४) गोपाळ महादेव काणेकर यांच्या मालकीची असून त्यांनी ती एक वर्षापूर्वी धिरज भुजबळकर (रा. ओसरगाव) याला वापरण्यासाठी दिली होती. धिरज भुजबळकर कणकवली येथे व्हिडीओ पार्लरमध्ये कामाला आहे.

१३ ऑक्टोबर २०२४ रोजी गोपाळ महादेव काणेकर महामार्गावरून घरी जात असताना पहाटे ४.३० वा.च्या सुमारास वागदे- डंगळवाडी येथे लोकांची गर्दी दिसली म्हणून गोपाळ महादेव काणेकर याने जाऊन पाहिले तर धिरज भुजबळकर अपघातग्रस्त झाला होता. त्याच्या डोकीस मार लागला होता. जखमेतून रक्त वाहत होते. तसेच पोटाला सुद्धा मार लागला होता. त्याला तिथून १०८ रूग्णवाहिकेतून ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्याला गोवा-बांबुळी येथे दाखल करण्यात आले. गोवा- बांबुळी येथील हॉस्पीटलमध्ये त्याच्यावर आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!