24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

ठाकरेंचा “पीएम” फंड म्हणजे पाटणकर मातोश्री फंड,मुख्यमंत्री असताना त्यात किती पैसा आला यांची चौकशी करा

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची मागणी

चतुर्वेदी,धनु बे यांचेकडून आलेल्या पैशाची ही चौकशी झाली पाहिजे

 चंदा लो और धंदा करो ही पाटणकर मातोश्री फंड ची पद्धत

आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सुनावले

कणकवली | मयुर ठाकूर : उद्धव ठाकरेंचा पाटणकर मातोश्री फंड म्हणजेच पीएम फंड आहे त्याच मुख्य कार्यालय हे कलानगर मध्ये असलेल्या वैभव चेंबर च्या चौथ्या मजल्यावर आहे.तेथे कोणत्या वहिनी साहेब बसतात हे सर्वांना माहीत आहे.आता पंतप्रधानांच्या पीएम फंडवर आरोप,आणि चौकशी मागण्या अगोदर पाटणकर मातोश्री फंड याचीही चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या पाटणकर मातोश्री फंड मध्ये किती पैसा आला ? कुठून पैसा आला ? नंदकिशोर चतुर्वेदी कडून किती,धनु बे,जुहू रियल ,चतुर्वेदी फंड यांचेकडून किती पैसा आला. यांच्याही चौकशीची मागणी करणार असल्याची माहितीही यावेळी भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी दिली.

आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊत यांनी पीएम फंड ची चौकशी व्हावी अशी मुक्ताफळ उधळली आहेत. ज्या पीएम फंडमुळे कोरोने काळात लोकांची मोठ्या प्रमाणात मदत झाली. समाजामध्ये मदतीचा हात म्हणून पीएम फंड मोठ्या प्रमाणात काम करत आहे.
त्यावर तोंड उघडण्याआधी उद्धव ठाकरेंचा पाटणकर मातोश्री फंड (पीएम फंड) ची चौकशी करा.अशी मागणी आमदार नितेश राणें यांनी केली आहे.यावेळी ते कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत यांनी स्वतः च्या एक्स अकाउंटवर चंदा लो और धंदा करो अशी पोस्ट केलीय. मग तुझ्या मालकाने या पाटणकर मातोश्री फंड मध्ये कुठून चंदा जमा केला.वैभव चेंबरमध्ये कुठला काळा धंदा चालू होता. तेथे कोणत्या मोठ्या मोठ्या डीलींग चालायच्या किंवा चालतात. आणि जो काही पाटणकर मातोश्री फंड चा पैसा आहे. तो उद्धव ठाकरेंचा कर्जतच्या फार्म हाऊसवर कुठे कुठे आणि किती जमिनीच्या खाली खोदून ठेवलेला आहे. या सगळ्या गोष्टीची चौकशी पीएम फंड चौकशीच्या निमित्तानं झाली पाहिजे. पहिलं स्वतःच्या मालकाच्या पाटणकर मातोश्री फंड च्या चौकशीची मागणी करा. त्यामध्ये थोडं लक्ष द्या. लोकांकडून जमवलेला चंदा ज्या चांदयावर तुझ्या मालकाचे कुटुंब चालत त्यावर ते जगतात. त्यावर लक्ष द्यायचं नाही. पण भारतीय जनता पक्ष, आमचे पंतप्रधान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याआधी पाटणकर मातोश्री फंड यांच्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. संजय राऊत यांनी केलेले आरोप आरशात बघून मातोश्रीवर केलेले आहेत. कारण मातोश्रीवर येणारा चंदा जो पाटणकर मातोश्री फंड च्या माध्यमातून तिथे पोहोचतो. त्याच्या किती दारूच्या व इतर कंपन्या आहेत. दानुबे नावाची कंपनीच नाव ऐयकल त्यावर मातोश्रीच फार मोठं प्रेम वाढलेल आहे. मातोश्री फ़ंड ची चौकशी होउदे दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे.

श्रीकांत शिंदे आरोपांच उत्तर देण्यासाठी समर्थ आहेत. नेमकं त्यांच्या फाउंडेशन बद्दलची बदनामी जे काय संजय राजाराम राऊत करत आहेत. त्याचं चोख उत्तर शिवसेनेच्या माध्यमातून व श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने दिले जाईल, असा विश्वास आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांना आम्ही देखील एक पत्र लिहिणार आहोत मातोश्री फंड हा उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली चालतो त्या पाटणकर मातोश्री फंड मध्ये आलेला पैसा कुठून आला आणि कोणी दिला नंदकिशोर चतुर्वेदीनी किती पैसा पाठवला ढानुबे डेव्हलपर्स चा किती पैसा आहे या सगळ्याची माहिती पंतप्रधानांना पत्र लिहून चौकशीची मागणी करणार आहोत. संजय राजाराम राऊत च्या पत्राची चौकशीची मागणी ते करत आहेत तशीच आम्हीही करू.

धर्मादाय आयुक्त, विधिमंडळाचे अध्यक्ष असो किंवा न्यायव्यवस्था असो हे सगळेच दबावाखाली असलेले वाटतात. जस काय हा सकाळी चहा द्यायला किंवा भांडी धुवायला हाच जातो. म्हणून कोण कोणत्या दबावाखाली नाहीय. कोणीही कोणत्याही पद्धतीचा न्याय मागितला तर धर्मादाय आयुक्त त्याला उत्तर देऊन त्या संदर्भात स्पष्टीकरण मागतील. त्यामध्ये कोणीही न्यायापलीकडे नाही. त्यामुळे त्याची चिंता संजय राजाराम राऊत ने करू नये.

रक्ता रक्तामध्ये, नसा नसामध्ये बेइमानी वाहत आहे. त्या संजय राजाराम राऊत ने दुसऱ्यांना बेईमान म्हणणं हा फार मोठा विनोद आहे. म्हणून याच उत्तर श्रीकांत शिंदे आणि शिवसेना लवकरच देईल.

काल जस सांगितलं आमचं महायुतीच सरकार आणि गृह खात कोणावर अन्याय करणार नाही. त्यामुळे त्या पद्धतीचा न्याय आमचं गृह खात आणि मुंबई पोलीस देतील असा विश्वास आम. नितेश राणेंनी व्यक्त केला.

जिथे जिथे आम्ही जातो त्यामुळे जिथे पाणी टंचाई होते तिथे तिथे आमही आमच्या पद्धतीने सुरळीत पणे करत असतो. सगळ्याच गोष्टी प्रसिद्धी साठी करणं हे लोकप्रतिनिधींना शक्य नाही.

काल मोदींची गॅरंटी नावाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. त्यामध्ये २०४७ पर्यंत आपला भारत देश महासत्ता बनवून कसा पुढे येईल. विकसित देश म्हणून कसा पुढे येईल. असे असंख्य मुद्दे त्याच्या अंतर्गत मांडले गेले. आपल्या देशाला विकसित करण्यासाठी जे जे करावं लागेल त्याचे सगळे मुद्दे जाहीरनाम्यात, संकल्प पत्रात आलेले आहेत. संकल्प पत्रात दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केलेले आहेत. आता मोदींनी दिलेली गॅरंटी ही अन्य कोणाच्याही गॅरंटी पेक्षा भक्कम आहे. जिथे जिथे गॅरेंटी म्हणून कर्नाटक राज्यात काँग्रेस च सरकार आले. त्यांना विचारा त्यांनी विधानसभेच्या काळात दिलेली गॅरेंटी त्यातील एकही गॅरेंटीपूर्ण करू शकेलेले नाही आहेत. एकीकडे गॅरंटी मागायची आणि दुसरीकडे निवडणूक पूर्ण झाल्यावर सांगायचे की आमच्याकडे पैसाच नाही गॅरंटी पूर्ण करायला. याला म्हणतात काँग्रेस.

पण संकल्प पत्रात दिलेली प्रत्येक गॅरेंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल केंद्र सरकार हे परत पुढच्या पाच वर्ष पुन्हा येतंय. ते राहिलेल्या सर्व गॅरेंटी पूर्ण करणार. विकसित भारत २०४७ पर्यंत बनणारच.

निवडणूक जवळ आल्यावर हे वैभव नाईक मातोश्रीवर असल्याचा आव आणतात. मातोश्रीवर आपली निष्ठा दाखवतात तो तसा विषय नाहीय. आशिष शेलार सिंधुदुर्गसाठी इकडचे भूमिपुत्र म्हणून मुंबई कोकण चा प्रवास करतात त्यांच्या विधिमंडळातील भाषण वैभव नाईक यांना पूर्णवेळ बसायची सवय असेल तर ते ऐयकतील. कारण आशिष शेलार यांचे दहा पैकी चार प्रश्न हे कोकणावर असतात. वैभव नाईक हे अर्धवेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केबिन मध्ये असतात. कोकण, सिंधुदुर्ग सोबत आशिष शेलार यांची किती नाळ जोडलेली आहे याचे सर्टिफिकेट वैभव नाईक यांच्याकडून मिळविण्याची गरज नाही.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!