26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

भुईबावडा घाट रस्ता वाहतुकीस बंद | ट्रक मालक संघटना सिंधुदुर्ग व वाळू वाहतूक संघटना कोल्हापूर यांनी आ. नितेश राणेंची घेतली भेट

आमदार नितेश राणे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा ; उद्यापासून घाट रस्ता वाहनांसाठी होणार खुला..

कणकवली | मयुर ठाकूर : बावडा घाटातून अवजड वाहने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. हा सध्याचा हंगाम हा आंबा, काजू बागायत दारांसाठी महत्वाचा आहे. अशा परिस्थितीमध्ये हा घाटमार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आल्यामुळे बागायतदारांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सहा चाकी गाड्यांना तरी मुभा देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

त्यामुळे आज कणकवली येथे स्वराज्य ट्रक मालक संघटना सिंधुदुर्ग व वाळू वाहतूक संघटना कोल्हापूर यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर घाट मार्गाबाबत चर्चाही केली. यावेळी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सहा चाकी वाहनांसाठी घाट रस्ता सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी दिलीप रावराणे, सागर पाताडे, अवधूत शेटये, समीर पाताडे, आशितोष परब, स्वराज पाताडे, गोट्या पांचाळ, मयुरेश गुरव सिद्धेश रावराणे चिन्मय तळेकर,कोल्हापूर येथील संघटनेचे अतुल जाधव, राकेश शिंदे, बापू वरदे, गणेश शिंदे, श्री.निगडे, राजु बर्गे उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!