23.2 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

कणकवलीत मतदार जनजागृतीसाठी सायकल फेरी

कणकवली | मयुर ठाकूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना दिली आहे तसेच राज्यघटनेने आपल्याला लोकशाही दिली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ होणार आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीला खूप महत्त्व असून मतदाराला त्याचा राजा असे संबोधले जाते. त्या मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार कणकवली विधानसभा मतदारसंघातील सर्वांनी शंभर टक्के बजावायला हवा असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले.

भारतीय निवडणूक आयोगाच्या मतदार जागरूकता व निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत उपविभागीय कार्यालय कणकवली तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्यावतीने कणकवली शहरातून लोकसभा निवडणुकीची जनजागृती व्हावी यासाठी सायकल व मोटर बाईक रॅली काढण्यात आली. याप्रसंगी श्री. कातकर बोलत होते. दीक्षांत देशपांडे म्हणाले स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मेळावा, महिला मिळावा, वृद्ध मेळावा असे कार्यक्रम घेण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाच्या आदेशाने स्विप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली आहे याद्वारे एकही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी काढण्यात आली आहे असे श्री. देशपांडे म्हणाले.

या रॅलीची सुरुवात तहसील कार्यालय येथे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर करण्यात आली. या रॅलीमध्ये प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नायब तहसीलदार सौ. हर्णे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी दिलीप पाटील, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी श्री. अघम यांच्यासह कनक रायडर्सचे सायकलिस्ट, विद्यामंदिर कणकवली व एस एम हायस्कूल कणकवलीचे विद्यार्थी, कणकवली कॉलेजचे एनएसएसचे विद्यार्थी त्याचबरोबर एनसीसीचे विद्यार्थी, शिक्षक तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली तहसीलदार कार्यालय येथे सुरू करून सर्विस रस्त्यावरून पटवर्धन चौकातुन बाजारपेठ, पटकी देवी, नगरपंचायत, कॉलेज रोड मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली.

रॅलीच्या सुरुवातीला ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा जागा हो’, ‘वृद्ध असो की जवान, प्रत्येकाने करा आपले मतदान’, ‘मतदान हा माझा हक्क आहे, मी मतदान करणारच’ अशा घोषणा देत मतदानाची शपथ घेण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!