26 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू | एक जखमी

धडक देणारा वाहनचालक पसार ; अज्ञात कारचा पोलिसांकडून शोध सुरू

कणकवली : येथील जाणवली पिकअप शेड नजिक रविवारी सायंकाळी ५:४५ वा. च्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक बसून अपघात झाला. या अपघातात आई व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. तर धडक देणारा वाहन चालक अपघात होताच घटनास्थळावरून पसार झाला. यासाठी पोलिसांनी चेक नाक्यांवर बंदोबस्त लावला असल्याची माहिती मिळाली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अपघातात जखमी झालेल्या मंगला रामचंद्र जाधव ( वय ७० रा. जाणवली ) या देवगड येथे आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या. देवगड येथून आल्यावर त्या जाणवली बस थांब्यावर उतरल्या. तेथून त्यांचा मुलगा शरदचंद्र रामचंद्र जाधव ( रा. जाणवली वय. ४७ ) हा नेण्यासाठी आला. तेथूनच रस्ता ओलांडत असताना मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात कारने धडक दिली. यामध्ये मुलगा शरदचंद्र जाधव व आई मंगला जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले.

जखमी मंगला जाधव व शरदचंद्र जाधव यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याने उपचारासाठी त्यांना येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शरदचंद्र जाधव ( रा. जाणवली वय. ४७ ) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली.

अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे, कॉन्स्टेबल मारुती बारड, स्मिता माने, कॉन्स्टेबल मनोज गुरव, कॉन्स्टेबल आर. के. पाटील, किरण कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. रविवारी सायंकाळी उशिरा पर्यंत अपघाताची माहिती नोंदविण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!