21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली साकेडी फाटा येथे चारचाकीची रिक्षाला धडक

रिक्षा चालक गंभीर जखमी ; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली साकेडी फाटा येथील वळणावर मुंबईहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या कारची ( क्रमांक एम एच ४८ सिके १२२१ ) ची उभ्या असलेल्या रिक्षाला ( क्रमांक एमएच ०७ एएच २६१२ ) ला मागून धडक बसून अपघात झाला. हा अपघात रविवारी दुपारी १२:४५ वा. च्या सुमारास झाला. या अपघातात रिक्षा चालक संदीप पांडुरंग चाळके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली साकेडी फाटा कणकवली येथील वळणावर चालक संतोष कुमार तिवारी हे आपल्या ताब्यातील चार चाकी घेऊन कुडाळच्या दिशेने चालले होते. यावेळी रिक्षा चालक संदीप पांडुरंग चाळके यांनी आपली रिक्षा ही रस्त्याच्या बाजूला उभी केली होती. या रिक्षेला चारचाकी कार चालक संतोष कुमार तिवारी यांच्या कारची मागून धडक बसली व अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालक संदीप पांडुरंग चाळके हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल राजाराम पाटील, कॉन्स्टेबल मारुती बारड यांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातात जखमी झालेल्या संदीप चाळके यांना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!