1.6 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

ऑलिंपिक स्पर्धेत विद्यामंदिर हायस्कूल तालुक्यात प्रथम

कणकवली : अध्ययन संस्था मुंबई यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शालेय विज्ञान सुधार उपक्रम सुरू आहे. या उपक्रमा अंतर्गत इयत्ता आठवी व नववी ची ‘पेशी’ या घटकावर तालुकास्तरीय ऑलिम्पिक स्पर्धा शिरगाव हायस्कूल येथे पार पडली. सदर स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीने सर्वप्रथम क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता सहावी व सातवी च्या विद्यार्थ्यांनी ‘मानवी अवयव संस्था’ या घटकावर झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. सदर विद्यार्थ्यांना प्रशालेचे विज्ञान विषय शिक्षक पृथ्वीराज बर्डे, शर्मिला केळुसकर, जनार्दन शेळके, ज्योत्स्ना तेली यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शि.प्र.मं. कणकवली च्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सेक्रेटरी बाळासाहेब वळंजू, ट्रस्टी अनिल डेगवेकर, मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, पर्यवेक्षिका व्ही. व्ही. जाधव, ज्येष्ठ शिक्षक अच्युतराव वनवे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!