कणकवली : माघी गणेश जयंती निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी गावागावांमध्ये माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आला होता. राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी प्रथम भिरवंडे वृद्धाश्रम येथील श्री गणेश जयंती उत्सवास उपस्थिती राहून श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर कनेडी, सिद्धिविनायक मित्रमंडळ कणकवली, असलदे (उगवतीवाडी), आयनल मणेरवाडी, शिरगाव, कट्टा देवगड, श्री गणपती मंदिर न्यास देवगड, श्री गणेश जयंती व ११ वा वर्धापन दिन सोहळा हुर्शी, पेशवेकालीन श्री रिद्धी, सिद्धी श्री देव गणपती मंदिर-चौकाळे, मु. हुर्शी-गडदेवाडी, गणपती मंदिर कासार्डे या ठिकाणी आयोजित माघी गणेश जयंती उत्सव ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले.
फोटो – अनिकेत जामसंडेकर