कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे फ्लायओव्हर वरील हॅलोजन गेले पंधरा दिवस बंद स्थितीत होते. ग्रामस्थांनी ही बाब आ. निलेश राणे यांच्या कानावर घातल्यानंतर अवघ्या काही तासांत पथदिवे सुरू करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई – गोवा महामार्गावर पणदूर येथे ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे फ्लायओव्हरवरील पथदिवे गेले १५ दिवस बंद स्थितीत होते. त्यामुळे फ्लायओव्हर वरून वाहने हाकताना वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. ग्रामस्थांनी ही बाब आ. निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. आ. निलेश राणे यांनी सायंकाळपर्यंत पथदिवे चालू होईल असे आश्वासन दिले. तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांना याबाबत सूचना केल्या. यानंतर आनंद शिरवलकर, निखिल कांदळगावकर, प्रकाश पावसकर यांनी स्वतः जतीनिशी लक्ष घालून विद्युत जनरेटर आणून पथदिवे सुरू करून घेतले.
आ. निलेश राणे यांच्या इम्पॅक्टमुळे महामार्गावरील बंद स्थितीत असणारे पथदिवे पुन्हा एकदा कार्यान्वित झाले. त्यामुळे ग्रामस्थांसह प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. आ. निलेश राणेंमुळे आज महामार्गावरील पथदिव्यांबरोबरच सिंधुदुर्गवासीयांच्या अशा देखील पल्लवित झाल्या आहेत.