आरोग्य व्यवस्था बळकटीकारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- आ. निलेश राणे
सिंधुदुर्ग : नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील असुविधांबाबत विशेष बैठक मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती त्या बैठकीत DMER संचालक यांनी प्रत्यक्ष पहाणी करण्याची सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या सूचनेप्रमाणे आज DMER संचालक श्री. अजय चंदनवाले यांनी सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन पहाणी केली.
या पहाणी दरम्यान आमदार निलेश राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांकडून रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामुग्री तसेच मनुष्यबळ पुरवठ्या संदर्भातील आढावा घेत त्यासाठी आपण वरिष्ठ स्थरावरून पाठपुरावा करणार असल्याबाबतची माहिती दिली.
या वेळी मेडिकल कॉलेज बांधकामाचा आढावा देखील कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी दिला. यावेळी दर्जेदार आणि वेगात काम करण्याची हमी सर्वगौड यांनी दिली यावर काम सुरू करता यावं यासाठी महिला हॉस्टेलसाठीच्या जागा स्थलांतरणाची माहितीही आमदार निलेश राणे यांनी घेत सिंधुदुर्ग वासीयांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू अस आवाहन आमदार निलेश राणे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
यावेळी DMER संचालक डॉ. अजय चंदनवाले, मेडिकल कॉलेज डिन डॉ. अनिल डवंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता अजय कुमार सर्वगौड आदी उपस्थित होते.