0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

काम घेऊन रखडवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादी टाकणार पालकमंत्री नितेश राणे

वराड व सोनवडे पुलाचा झाला लोकार्पण सोहळा संपन्न

पालकमंत्री व आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाला लोकार्पण सोहळा

कुडाळ : वराड व सोनवडे गाव जोडणारे पूल हे आमदार निलेश राणे यांच्या विजयाची वाट पाहत होते म्हणूनच याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत होत आहे याला म्हणतात पायगुण नाहीतर चिपी विमानतळाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले त्या चपट्या पायामुळे या विमानतळावर येणारी विमाने सुद्धा बंद झाली असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगून जो ठेकेदार मस्ती करणार त्याला काळ्या यादीत टाकणार, कारण हा पैसा जनतेचा आहे. तुमच्या बापाचा नाही असे ठेकेदारांना खडसावून वेळेत काम पूर्ण झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

मालवण तालुक्यातील वराड व कुडाळ तालुक्यातील सोनवडे गाव जोडणारे बहुचर्चित पुलाचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, वराड सरपंच शलाका रावले, सोनवडे, सरपंच पूर्वी सावंत- धुरी, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, अशोक सावंत, काका कुडाळकर, मालवण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेनेच्या महिला प्रमुख वर्षा कुडाळकर, बाळा चिंदरकर, विश्वास गावकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले, श्रीमती काळे, संतोष साटविलकर आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, काही गोष्टींना योग यावा लागतो आणि सर्वात महत्त्वाचा पायगुण सुद्धा आहे. गेल्या दहा वर्षात जिल्ह्याच्या विकासाला अपशकुनि पायगुणांमुळे खिळ बसली होती. पण आता झपाटाने विकास कामे होत राहतील. या मतदारसंघाचे आमदार निलेश राणे आहेत. ते या मतदारास संघाचा बॅकलॉग भरून काढणार यात कुठेही शंका नाही. त्यांच्याच पायगुणामुळे या रखडलेल्या पुलाचे लोकार्पण होत आहे. नाहीतर चिपी विमानतळाचे उद्घाटन केले ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चपट्या पायामुळे विमानसेवा बंद झाली असे सांगून आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना लोकहिताचा आदर करून त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या योजना महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जनतेचा पैसा जनतेसाठी वापरला गेला पाहिजे ठेकेदारांच्या बापाचा हा पैसा नाही. हे पूल गेली सहा वर्ष रखडले यामध्ये शासनाचे मोठे नुकसान झाले. अशा ठेकेदारांना यापुढे काळ्या यादीत टाकले जाणार आणि तशा प्रकारची कार्यवाही लवकरच सुरू करू. जे कोणी कामे घेऊन आहेत. त्यांना कामे करावी लागतील. सध्या जिल्हा प्रशासनाकडून जो काही मी आढावा घेत आहेत त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत. पण ते खपवून घेतले जाणार नाही पुढील काळात जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला जाईल. तुमची साथ आम्हाला महत्त्वाची आहे आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे सांगून जिल्हा मेडिकल कॉलेजमध्ये जो काही कारभार सुरू होता तो आरोग्यमंत्र्यांच्या आमदार निलेश राणे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर येथील अधिष्ठाता यांची तात्काळ बदली करण्यात आली असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की हा लोकार्पण सोहळा होत असताना काही गोष्टी जनतेच्या निदर्शनास आणून देणे महत्त्वाचे आहेत २०१३ मध्ये खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून हा पूल मंजूर झाला २०१८ मध्ये सर्व तांत्रिक गोष्टी पूर्ण करून ठेकेदार नेमण्यात आला. त्यावेळी या पुलाची अंदाजपत्रकीय रक्कम आठ कोटी होती पण ती आता पंधरा कोटी पर्यंत गेली. गेल्या सहा वर्षात ठेकेदाराने वेगवेगळी कारणे सांगून अंदाजपत्रकीय रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढवून घेतली. ही गोष्ट चुकीची आहे. हा शासनाचा पैसा आहे तो ठेकेदाराचा नाही. जनतेला ठेकेदार मोठा वाटत असेल आम्हाला नाही. त्यांनी काम वेळीच पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण ठेका देताना त्या करारात तशी तरतूद असते. या ठेकेदारांचा मुलगा आपल्या निवडणुकीमध्ये करोड रुपये उडवतो. आणि जनतेसाठी आवश्यक असलेल्या पूलाचे काम सहा वर्षे रखडतो. हा कोणता न्याय हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. अशा ठेकेदारांना काळ्या यादी टाकले पाहिजे यापुढील काळात कोणाचीही गय केली जाणार नाही असे सांगून माझ्याजवळ कोणतेही पद नसताना माजी बांधकाम व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मला मोठे सहकार्य केले. हे पूल बनण्यासाठी त्यांचेही मोठे योगदान आहे असे सांगितले. वाळू व्यवसायिकांनी अधिकृत वाळू व्यवसाय सुरू करावा म्हणजे प्रशासनाला कारवाई करायला मिळणार नाही तुम्ही अनधिकृत व्यवसाय करत असाल तर प्रशासन कारवाई करणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी वराड व सोनवडे गावातील जमीन दान करणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्याप्रसंगी आभार श्रीमती काळे यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!