कुणाच्यातरी हट्टामुळे सावंतवाडीतील २ सभा रद्द
संपादक | मयुर ठाकूर : सावंतवाडी विधानसभेतील भारतीय जनता पार्टी च्या नियोजित सभा कोणाच्या तरी हट्टामुळे २ वेळा रद्द झाल्या. कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन सभेचे नियोजन केले होते. माझ्या सर्व कार्यकर्त्याना झालेल्या त्रासाबद्दल मी मनापासून माफी मागतो हे माजी आमदार राजन तेली यांचे व्हाटसप स्टेटस सध्या चर्चेत आहे.
आज सकाळी आमदार राजन तेली यांनी आपल्या व्हाटसप ला हे स्टेटस ठेवत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. यातून भाजपात असलेली अंतर्गत धुसफूस बाहेर आली असून याची जोरदार चर्चा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आहे.