कणकवली : कुडाळ नगरपंचायतवर महायुतीचा भगवा फडकल्यानंतर कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नवनियुक्त नगराध्यक्षा प्राजक्ता आनंद शिरवलकर यांच्यासह नगरसेवकांनी खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार नारायण राणे यांनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक तथा गटनेते विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, अभी गावडे, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, माजी नगरसेवक राकेश कांदे आदी उपस्थित होते.