राज्यस्तरीय पारंपारिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन
कणकवली शहरात निघणार भव्य रॅली
कणकवली : सकल मराठा समाज, कणकवलीच्यावतीने शिवजयंती उत्सव १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवजयंती निमित्त कणकवली शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय पारंपारिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, सकाळी ९:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कणकवली बाजारपेठ मार्गे भव्य मोटरसायकल रॅली , सकाळी ११ वाजता कणकवली मराठा समाज प्राथमिक शिक्षक आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला , वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. रात्री ९ वाजता राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा होईल.या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३३ हजार रुपये व चषक , द्वितीय पारितोषिक २२ हजार व चषक , तृतीय पारितोषिक ११ हजार व चषक असणार आहे. १५ संघांना प्रवेश देण्यात येणार आहे.
तरी लोकनृत्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महेंद्र सांब्रेकर ९८६०३११२७७ , बच्चू प्रभुगांवकर ९४२२६३२६२१, सुशिल सावंत ९०२१५००४४३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.