23.5 C
New York
Sunday, July 13, 2025

Buy now

कणकवली ते पंढरपूर जाणाऱ्या परमहंस भालचंद्र महाराज वारकरी पायी दिंडीचे झाले प्रस्थान

कणकवली : माघ शुद्ध एकादशी साठी पंढरपूर विठ्ठल दर्शनाला जाणारी परमहंस भालचंद्र महाराज वारकरी पायी दिंडी (वारी) पायी दिंडी आज रविवार २६ जानेवारी रोजी कणकवली येथून प्रस्थान झाली. सकाळी प. पू. भालचंद्र महाराज समाधीचे दर्शन घेऊन विना, तुळस, कळस, चोपदारदंड, टाळ, मृदुंग यांचे विधिवत पूजन करून वारीचे प्रस्थान झाले. यावेळी वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष ह.भ. प. गवंडळकर महाराज, ह.भ. प. गायकवाड महाराजा, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे कार्याध्यक्ष संतोष राऊळ,सदस्य दिकप मडवी, हर्षल अंधारी,गजानन देसाई,अशोक लाड, श्याम लाड,ओंकार सावंत, आदी सह प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत ही वारी पंढरपूरकडे रवाना झाली.

टाळ मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत, संतांच्या विविध अभंगांचे गायन करत ही वारी रवाना झाली.कलमठ कलेश्वर मंदिर येथे सकाळचा विसावा घेऊन दुपारी करून आणि रात्री लोरे नंबर एक येथे मुक्काम करून कणकवली तालुक्यातून गगनबावडा मार्गे प्रस्थान करणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!