0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

उत्पन्न वाढीसाठी मोहोर संरक्षण महत्त्वाचे – श्री.गोळवणकर

असरोंडी येथे आंबा,काजू मोहोर संरक्षण प्रशिक्षण संपन्न

कणकवली : शनिवार दि. २५/०१/२०२५ रोजी मालवण तालुक्यातील असरोंडी येथे श्री.संदीप परब यांच्या काजू बागे मध्ये तालुका कृषि अधिकारी कार्यालय मालवण व आत्मा तसेच ग्रामपंचायत असरोंडी यांच्या सहयोगाने आंबा काजू मोहोर संरक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदरील कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला चे शास्त्रज्ञ श्री. गोपाळ गोळवणकर , मंडळ कृषी अधिकारी श्री. आर. एस. चव्हाण , सरपंच श्री अनंत पोईपकर , उपसरपंच श्री. बाळकृष्ण सावंत , कृषी पर्यवेक्षक श्री. डी. के. सावंत , सहा. तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) श्री. एन. एम. गोसावी , कृषि सहाय्यक श्री. नितेश पाताडे व मोठ्या संख्येने आंबा काजु बागधारक शेतकरी उपस्थित होते . या कार्यक्रमामध्ये शास्त्रज्ञ श्री. गोळवणकर यांनी आंबा व काजु फळ झाडांच्या मोहोराचे योग्य संरक्षण व रोग किडींचे योग्य व्यवस्थापन कसे करावे या बद्दल तसेच आताच्या सिंधुदुर्गातील वातावरणानुसार आंबा व काजू मोहोराचे योग्य रीतीने संरक्षण कसे करता येईल यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले . सदरील कार्यक्रमास उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला. या सर्व कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत उपसरपंच श्री.सावंत यांनी मांडले . सदरील कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कृषि पर्यवेक्षक श्री. सावंत यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक श्री. नितेश पाताडे यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!