0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे बांद्यात जल्लोषी स्वागत

बांदा : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्याने महायुतीतर्फे बांदा येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. ‘नितेश साहेब आगे बढो हम आपके साथ है’ या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजपासह शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री पदी ना. नितेश राणे यांचे निवड जाहीर झाल्यानंतर आज प्रथमच त्यांचे जिल्ह्यात आगमन झाले. मोपा विमानतळावरून कारने कणकवली कडे जाताना बांदा कट्टा कॉर्नर येथे त्यांचे महायुती तर्फे उत्साही व जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन ना. नितेश राणे यांचे अभिनंदन व स्वागत केले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक संजू परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, प्रितेश राऊळ, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, माजी महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, ज्येष्ठ नेते नासीर काझी, युवा मोर्चाचे संदीप मेस्त्री, जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, कुडाळ नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, माजी संचालक प्रकाश गवस, माजी राज्य कार्यकारिणी सदस्य शामकांत काणेकर, माजी सभापती मानसी धुरी, शीतल राऊळ, बांदा सरपंच प्रियांका नाईक, माजी सरपंच मंदार कल्याणकर, राखी कळंगुटकर, किनळे सरपंच दीपक नाईक, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, उपसरपंच दीपक नाईक, ग्रा. पं. सदस्य बाळू सावंत, श्याम मांजरेकर, रूपाली शिरसाट, तनुजा वराडकर, दीपलक्ष्मी सावंत, श्रेया केसरकर, देवल येडवे, तांबुळी सरपंच विशाखा नाईक, प्रसाद पावसकर, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, सिद्धेश पावसकर, स्वागत नाटेकर, हनुमंत पेडणेकर, कास सरपंच प्रवीण पंडित, वाफोली उपसरपंच विनेश गवस, मंदार नार्वेकर, भैय्या गोवेकर, महेश धुरी, गुरु कल्याणकर, उदय देऊलकर, संदीप बांदेकर, आत्माराम गावडे, देविदास सातार्डेकर, महेंद्र पालव, दादा परब, डेगवे सरपंच राजन देसाई, मधुकर देसाई, प्रवीण देसाई, कैलास गवस, साई धारगळकर, गुरुनाथ सावंत, हुसेन मकानदार, तेजस परब, सिद्धेश महाजन, विलास पावसकर, नंदू पालव, शैलेश केसरकर, निवृत्त मुख्याध्यापक म. ल. देसाई, अभिलाष देसाई, सिद्धेश कांबळी, ज्ञानदीप राऊळ, नंदू महाजन, सुनील राऊळ, पांडुरंग नाटेकर, भाऊ वाळके, अर्णव स्वार यांच्यासह जिल्हाभरातील शेकडो महायुती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!