1.6 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा

औषध कर्मचारी हा ग्राहक आणि मालक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे – विभा खानोलकर

सिंधुदुर्ग : जिल्हा औषध कर्मचाऱ्यांचा मेळावा आज वेंगुर्ला कॅम्प येथील सुनिल गावसकर स्टेडियम मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. औषध कर्मचारी हे आपल्या औषध व्यवसायात खूप आत्मीयतेने काम करतात तसेच कर्मचारी संघटनेच्या या एकिबद्दल समाधान वाटते,आपल्या या व्यवसायात औषध कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वेंगुर्ला तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ औषध व्यापारी श्री.विभा खानोलकर यांनी व्यक्त केले.तसेच कोरोना सारख्या महामारीत सुद्धा ज्या प्रकारे औषध कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली त्याबद्दल सुद्धा संघटनेचे कौतुक केले.

व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनचे अध्यक्ष श्री.समीर ठाकूर,उपाध्यक्ष श्री.साईश अंधारी,सचिव श्री.अभिजीत गुरव,खजिनदार श्री.शेखर कुंभार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. मेळावा दरम्यान कर्मचाऱ्यांचे काही क्रिकेट सामने सुद्धा झालेत. या कार्यक्रमाला जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी,सर्व तालुकाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील औषध ज्येष्ठ कर्मचारी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री.उमाकांत खानोलकर,श्री.प्रशांत नेरूरकर,श्री.रोहित नाईक,श्री.परवेझ शेख ,श्री.मंदार सातार्डेकर,श्री.नंदू उबाळे,श्री.विजय घाडी,श्री.संजय घाडी,श्री.अमर गावडे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात.

कार्यक्रमाच्या उत्कृष्ठ नियोजनासाठी जिल्हा संघटनेच्यावातीने अध्यक्ष श्री.समीर ठाकूर यांनी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री.आदित्य आजगावकर,आशिष गोठोस्कर तसेच श्री.प्रशांत मठकर यांचे आभार व्यक्त केलं.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.दिपक मेस्त्री यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!