चिपी विमानतळ बाबत लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचा व्यक्त केला विश्वास
मयुर ठाकूर ( सिंधुदुर्ग ) : सिंधुदुर्गच्या जनतेमुळे आम्ही राणे कुटुंबीय महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेचा सेवक म्हणून मी करेन अस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्गच्या जनतेने जेवढे आशीर्वाद दिलेत त्या आशीर्वादांची परतफेड म्हणून जेवढ जमेल तेवढ काम या निमित्ताने मी करेन. सिंधुदुर्गच्या जनतेसाठी पर्यटन दृष्ट्या रोजगार निर्माण करणं यासाठी माझे प्रयत्न आहेत. आंबा, काजू सारखी फळ पीक आहेत. त्याच्या माध्यमातून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवणे हा हेतू असणार आहे. त्याचप्रमाणे मत्स्य उद्योग व बंदरे विकास या खात्याच्या माध्यमातून मच्छीमारांसाठी योग्य प्रकारे काम करणार असून आमचा सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्याच्या शेजारी असल्यामुळे सुरक्षितता त्याचबरोबर अमली पदार्थ असो किंवा विविध गोष्टींची तस्करी असो या गोष्टींवर माझा फार बारकाईने लक्ष असणार आहे. जेव्हा खासदार नारायण राणे पालकमंत्री होते तेव्हा आमचा जिल्हा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर होता. आता देखील त्याच पद्धतीची घोडदौड पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. चिपी विमानतळा संदर्भातील प्रश्नाबाबत खासदार नारायण राणे राज्य आणि केंद्राच्या मंत्र्यांशी नेहमी संपर्कात आहेत. हे विमानतळ सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे येथे एक दोन-दोन विमाने न उतरता सर्व प्रकारचे विमान याठिकाणी यावीत असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे चिपी विमानतळासंदर्भात लवकरच गोड बातमी भेटेल, असे सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे म्हणाले.