0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

गोळवण ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारला बंधारा

मसूरे : आदर्श गाव गोळवण – कुमामे – डिकवल येथील गोळवण गावठण वाडीतील कशाळी बंधारा शंभर टक्के लोकवर्गणीतून उभारण्यात आला. या बांधाऱ्या करता दहा ग्रामस्थानी दहा दिवस श्रमदान केले. तसेच एक लाख दहा हजार रुपये लोकवर्गणी खर्च केली गेली.
या बंधाऱ्या मुळे 15 हेक्टर जमीन ओलीता खाली येते. सदरच्या बंधारा कामाची सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संजय पाताडे यांनी पाहणी करून कौतुक केले. गोळवण ग्रामस्थांनी एकजूट दाखवत पाण्याचा संचय वाढवण्यासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे सरपंच सुभाष लाड म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!