31.6 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

विजयदुर्गच्या समुद्रात एलईडी लाईटच्या साह्याने मच्छीमारी करणाऱ्या बोटीवर कारवाई

सिंधुदुर्ग : विजयदुर्ग मधील समुद्रात मुक्ताई या मच्छीमारी नौकेवर एलईडी लाईटच्या मदतीने मासेमारी करताना कारवाई करण्यात आली आहे. सागरी मासेमारीचे नियमन अधिक प्रभावी करण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री, नामदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

सदर ड्रोन देखरेखीत सौ. प्रज्ञा प्रभाकर पेडणेकर यांच्या “मुक्ताई” नावाच्या नौकेचा (नोंदणी क्रमांक: IND-MH-5-MM-3604) अनधिकृतपणे एल.ई.डी. लाइटच्या सहाय्याने मासेमारी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावर परवाना अधिकारी, देवगड यांनी सागरी कायद्याच्या तरतुदींनुसार नोटीस जारी करत नौका व संबंधित सामग्री जप्त करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, दिनांक १७/०१/२०२५ रोजी नौकेच्या मालकाने नौका व सामग्री ताब्यात दिली आहे. अंदाजे ८ ते १० लाख रुपये किंमतीच्या एल.ई.डी. लाइट पुरवणाऱ्या उपकरणांसह नौका जप्त करण्यात आली आहे. जप्त नौका विजयदुर्ग बंदरात ठेवण्यात आली आहे.

अंमलबजावणी अधिकारी श्री. पार्थ तावडे (सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी व परवाना अधिकारी, देवगड) यांनी प्रतिवेदन सादर केल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!