कणकवली येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
कणकवली : कणकवली चे श्रध्दास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२१वा जन्मोत्सव सोहळा १६ ते २० जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी आश्रमात साजरा होणार आहे. या उत्सवाची संस्थानच्यावतीने जय्यत तयारी सुरू आहे.
१६ ते १९ जानेवारी या कालावधीत पहाटे ५:३० ते ८:०० काकड आरती, समाधीपूजा, अभिषेक. सकाळी ८:०० ते १२:३० सर्व भक्त कल्याणार्थ परमहंस भालचंद्र दत्त पवमान स्वाहाकार, दुपारी १२:३० ते ३:०० आरती व महाप्रसाद, दुपारी १:०० ते ४:०० भजने, सायंकाळी ४:०० ते रात्री ८:०० सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर आरती, तर १९ जानेवारी रोजी सकाळी ९:०० ते १२:०० यावेळेत रक्तदान शिबिर होईल. यावेळी १२१ जणांनी रक्तदान संकल्प केला आहे. २० जानेवारी रोजी बाबांचा १२१वा जन्मदिन आहे. या दिवशी पहाटे ५:३० ते ८:०० काकड आरती समाधीपूजा, जपानुष्ठान, सकाळी ८:०० ते ९:०० भजने, सकाळी ९:०० ते ११:३० समाधीस्थानी लघुरूद्र, सकाळी ९:३० ते १२:०० जन्मोत्सव कीर्तन (ह. भ. प. भाऊ नाईक, वेतोरे, ता. वेंगुर्ले), दुपारी १२:०० वाजता परमहंस भालचंद्र महाराज यांचा १२१वा जन्मसोहळा, दुपारी १२:३० ते ३:०० आरती व महाप्रसाद, सायंकाळी ५:०० वाजता परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची घोडे तसेच वारकरी मंडळींच्या समवेत कणकवली शहरातून भव्य मिरवणूक व त्यानंतर आरती. रात्री १२:०० वाजल्यानंतर कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर यांचे ‘काल हस्तीश्वर महिमा’ ट्रे महान पौराणिक ट्रीकसीनयुक्त दशावतारी नाटक होणार आहे. तसेच १६ जानेवारी रोजी सायंकाळी ३:३० ते ७:३० यावेळेत शाळा नं. ३च्या मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, १७ रोजी दुपारी ३:३० ते ५:१५ यावेळेत राधाकृष्ण संगीत साधना, सिंधुदुर्ग प्रस्तुत विणा दळवी आणि सहकारी, होडावडे वेंगुर्ले यांचा ‘स्वरसंध्या’ कार्यक्रम, सायंकाळी ५:३० ते ७:३० यावेळेत मनोज मेस्त्री, कणकवली यांचा गुरूवंदना कार्यक्रम होईल. १८ जानेवारी रोजी सायंकाळी ४:०० ते ७:४५ या वेळेत ग्रामदेवता दशावतार नाट्य मंडळ, बिडवाडी यांचा “भक्तांचा कैवारी कृष्णमुरारी” दशावतारी नाट्यप्रयोग. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ७:४५ या वेळेत निवडक कलाकारांचा दशावतारी संघ यांचे दशावतारी नाटक होणार आहे.
या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.