1.6 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

मुंबई गोवा -महामार्गावर ओरोस येथे बोलेरो पिकअप चा अपघात

ओरोस : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप ( क्रमांक – एम एच ५० एन २७९३ ) चा अपघात झाला. हा अपघात रविवारी सकाळी १०.१५ वा.च्या सुमारास ओरोस येथील खालसा पंजाबी धाबा समोर झाला. ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जात असताना बोलेरो पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटले व बोलेरो पिकअप रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरवर आदळली व रस्त्याच्या मधोमध डाव्या बाजूने पलटी झाली. यामध्ये पिकअपमधील एकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला नजिकच असलेल्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!