माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांची उपस्थिती
दिलेले शब्द लवकरच पूर्ण करणार असल्याचे दिले आश्वासन
कणकवली | मयुर ठाकूर : अलीकडे मोठ्या प्रमाणात विकास कामांची भूमिपूजन, शुभारंभ केले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून शुभारंभ किंवा भूमिपूजन केली जातात. कणकवली तालुक्यातील नरडवे पिंपळवाडी येथील राणेवाडीच्या पायवाटेचे भूमिपूजन एका ७८ वर्षाच्या आजीच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी माजी जि.प. अध्यक्ष संदेश ( गोट्या) सावंत उपस्थित होते. यावेळी श्री. सावंत यांनी गावातील सर्व विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करु आसा विश्वास पिंपळवाडीतील ग्रामस्थांना दिला.
यावेळी माजी सभापती सुरेश ढवळ, सरपंच गणपत सावंत, उपसरपंच वैभव नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्य विनोद बागवे, सुहास सावंत, श्री. राणे यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.