वनविभागाच्या वतीने कणकवलीतील पत्रकारांचा केला सन्मान
कणकवली | मयुर ठाकूर : पत्रकार दिनाच्या निमित्ताने कणकवली वनक्षेत्रपाल आर. डी.घुणकीकर यांनी कणकवली तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांची लेखणी असलेले पेन व पुष्प देऊन उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी कार्यकारणी सदस्य सुधीर राणे,आपला सिंधुदुर्ग चे संपादक राजन चव्हाण, पत्रकार राजेश सरकारे, उमेश बुचडे, संजोग सावंत, दर्शन सावंत, विराज गोसावी, संवाद महाराष्ट्र न्युजचे संपादक मयूर ठाकूर, चित्तरंजन जाधव आदी उपस्थित होते. यावेळी घुणकीकर यांनी सांगितले की पत्रकार समाजात राहून नेहमी सर्वसामान्यांची बाजू मांडत असतात. त्यामुळेच आमच्या वनखात्याला शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि वन खाते यांच्यातील दुवा हे पत्रकार आहेत
त्यामुळेच आज आम्ही पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान करत आहोत असे सांगितले
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांनी सांगितले कि वनविभागाच्या जे नवनवीन उपक्रम आपण राबवता ते आपण पत्रकार म्हणून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. तसेच कणकवली वनक्षेत्रपाल घुणकीकर यांनी आमच्या सोबत नेहमी सुसंवाद ठेवला आहे असाच पुढेही ते ठेवतील आणि त्यांनी आज पत्रकार दिनाचे निमित्ताने आमचा सन्मान केला त्याबद्दल सर्वच वनविभागाचे आम्ही ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुकाध्यक्ष अजित सावंत यांनी सांगितले की वनशेत्र पाल घुणकीकर यांचे काम खूप चांगले आहे.पत्रकार संघाच्या वृक्षारोपण कार्यक्रमास आम्हाला लागवडीसाठी झाडे उपलब्ध करून दिली तसेच सामाजिक उपक्रमात देखील त्यांचा सहभाग असतो त्यामुळे असे अधिकारी आम्हाला लाभले त्याबद्दल वनविभागाचे आभार सावंत यांनी मानले यावेळी वनपाल दिघवळे सर्जेराव पाटील , वनपाल भिरवंडे कुसुम कांबळे , वनरक्षक दिघवळे प्रतिराज शिंदे , लेखापाल जे. बी. राठोड , मधुकर सावंत,लिपिक आंबेरकर , श्री शिर्के, तांबे, गावकर वन मजूर उपस्थित होते