कणकवली : येथील कॉलेज कणकवली कनिष्ठ महाविद्यालय + दोन स्तर तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्र कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने दत्तक गाव हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत विद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा दरम्यान पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी सोशल मीडियापासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे व आपले पालक व मित्रमंडळींना याबाबत माहिती द्यावी. ऑनलाइन फ्रॉड पासून दुर रहावे. विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या आई – वडिलांचे विचार असतात की आपली मुलगी ही मोठी अधिकारी व्हायला पाहिजे असे त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच हवालदार विनोद चव्हाण यांनी वाहतूक नियोजन म्हणजे काय ? वाहन परवाना चार चाकी दुचाकी सर्व नियम स्पष्ट सांगितले. प्रत्येकाने नियम पाळले पाहिजे. दुचाकीसाठी पुढे चालवणारा त्याला पण हेल्मेट पाहिजे व मागच्या व्यक्तीला पण हेल्मेट सक्तीचे आहे, असे मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाप्रसंगी कॉन्स्टेबल राज आघाव, हवालदार मिलिंद देसाई, कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय सावंत, सौ. वाळके उपस्थित होते.