प्रवीण भोसले यांची मागणी ; मंत्री नितेश राणेंसह खासदार राणेंची घेतली भेट…
सावंतवाडी : शरद पवार राष्ट्रवादीचे नेते तथा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज मत्स व बंदर मंत्री नितेश राणे व खासदार नारायण राणे यांची मुंबई जाऊन भेट घेतली. यावेळी सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि दोडामार्ग येथील आडाळी एमआयडीसीचा प्रश्न लवकरात-लवकर मार्गी लागण्यासाठी योग्य तो प्रयत्न करण्यात यावेत आणि सिंधुदुर्गातील हजारो तरुणांना नोकऱ्या मिळतील या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत सतीश शेठ, संतोष कोठारी आदी उपस्थित होते. नववर्षाच्या सुरुवातीला श्री. भोसले यांनी आज मंत्री राणे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी विविध विषयावर चर्चा झाली.