सावंतवाडी : उभ्या बुलेटला दुचाकीची धडक देऊन स्वतःसह दुसऱ्याच्या अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी ओंकार पांढरे (रा. निरवडे- कोनापाल) या युवकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास येथील शिरोडा नाका परिसरात घडला होता. यात बाबुराव नाईक (रा. कोलगाव) हा गंभीर जखमी झाला होता. दरम्यान उदय शांताराम रेडकर यांनी आज सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ओंकार पांढरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शिराडा नाका परिसरात थांबलेल्या बुलेटला दुचाकीची धडक बसून अपघात घडला. या अपघातात ओंकार व बाबुराव हे दोघे गंभीर झाले. अपघातानंतर या दोघा युवकांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने गोवा-बांबूळी येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान उदय रेडकर यांनी आज सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ओंकार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.