ब्युरो न्युज : 8 जानेवारीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शरद पवार गटाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित राहून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीत पक्षसंघटनेतील बदल, प्रदेशाध्यक्ष पदाची निवड आणि पुढील वाटचालीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांच्या ऐवजी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होऊ शकते. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर चर्चा होण्याची शक्यता असून, याला काही नेत्यांचा विरोध आहे.