कणकवली : तालुक्यातील तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि. २) सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध गुणवंत विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुंबई येथील कर सल्लागार संतोष परशुराम तळेकर हे अध्यक्ष असून, प्रमुख अतिथी म्हणून कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पुणेचे अध्यक्ष अजय संभाजी पाताडे, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, लेखक दीपक कदम उपस्थित राहणार असून, यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच रिया चव्हाण, उद्योगपती नामदेव बांदिवडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रमांतील गुणवंत विद्यार्थी, शैक्षणिक यशस्वी विद्यार्थी आणि गुणवंत कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. ३ जानेवारीला सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा आयोजित केली असून, दुपारी १२ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. या दोन्हीही कार्यक्रमांना माजी विद्यार्थी, माजी कर्मचारी, पालक, ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.