कणकवली : कोणत्याही गुन्ह्यातील आरोपीचे वकीलपत्र घेणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र कुठल्यातरी एखाद्या गुन्ह्याचा संदर्भ घेत आमदार नितेश राणेंवर आरोप करणाऱ्या सुशांत नाईक यांनी आपला बांधकाम व्यवसाय हा फक्त शिवसेना मर्यादितच आहे का? ते अगोदर जाहीर करावे. कारण सुशांत नाईक बांधकाम व्यवसायिक असून ते सर्वच पक्षाच्या लोकांशी आपले हितसंबंध ठेवतात. त्यामुळे आमदार नितेश राणेंवर टीका करताना सुशांत नाईक यांनी आपले बांधकाम व्यवसायाच्या संदर्भातील हीतसंबंध पाहावे. असा टोला भाजपाचे शहराध्यक्ष आण्णा कोदे यांनी लगावला. ज्या श्रीधर नाइक यांचा खून झाला त्यातील संशयित आरोपी असलेले परशुराम उपरकर हे सुशांत नाइक यांच्या सोबत व्यासपीठावर बसतात. आमदार वैभव नाईक यांनी त्यांना शिवसेनेमध्ये घेतले यावेळी सुशांत नाइक यांची नैतिकता कुठे गेली होती? ज्या वैभव नाईकांनी उपरकर यांना आपल्या सोबत घेतले त्यामुळेच त्यांना पराभवाची चव चाखावी लागली. कणकवली शहरात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ला विरोध करणारी नाईक कंपनीच होती. पण त्यांच्यातल्या अनेकांना आता स्वतःच्या मुलांना या स्कूलमध्ये पाठवावे लागते. लक्ष्मी चित्रमंदिर मध्ये चित्रपट पाहण्यासाठी देखील नाइक यांना जावे लागते. नारायण राणेंच्या मुळे ह्या झालेल्या सगळ्या सुविधा नाईक विसरतात. आपल्या फायद्याचां विषय टाळण्याचां एक कलमी कार्यक्रम सुशांत नाईक यांनी केला. मात्र यावेळी त्यांचे मनसुबे त्यांच्या भावानेच उधळले. व यापूर्वी आमदार असलेल्या भावाचे मनसुबे निलेश राणे यांनी उधळले. त्यामुळे सुशांत नाइक यांनी नितेश राणेंवर टीका करताना आपले पाय किती खोलात आहेत ते तपासून पाहावे असा टोला भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी लगावला आहे.