कणकवली : कोल्हापूर येथे झालेल्या अबॅकस स्पर्धेत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा या जिल्ह्यातून एकूण १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. यात कणकवली सेंटरचा वेदांत गुरव व फरहीन बटवाले हे विद्यार्थी ५ मिनिटात १०० पैकी १०० गुण मिळवत पहिले आले. तर पार्थ तेली व चैतन्य टायशेटे यांनी ९९ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. अवनी बावकर हिने आपल्या गटात तिसरा तर मंथन वायंगणकरने चौथा क्रमांका मिळवला. इ. १ ली तील वैभवी येरावार हिने लहान गटात ६ मिनिटात ९० पेक्षा जास्त गणित सोडवत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळावले. स्पर्धेत कणकवली सेंटर च्या २० पेक्षा जास्त मुलांनी उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड मेडल मिळवले आहे.
यापूर्वी १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या वैदिक गणित स्पर्धेमध्ये सेंटरच्या ८ विद्यार्थ्यांना ट्रॉफी मिळाली आहे. वैदिक गणितामध्ये ९८ मार्क मिळवत कार्तिक साईल व परिणीती ठाकूर यांनी पहिला क्रमांक पटकावला. तसेच सेंटरच्या अनन्या पडते, अनिकेत करंबेळकर, अर्णव पाटील, भूमी बंडागळे, शौर्य नाचणे व सेजल पिळणकर यांनी चांगली कामगिरी करत ट्रॉफी मिळवली. या सर्व मुलांना प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वैदिक गणित सेंटर कणकवलीच्या संचालिका डॉ. स्नेहल जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.