कोल्हापूर | यश रुकडीकर : बाहेरगावी गेलेल्या गिरीश शंकरराव कुंदे,रा.जवाहरनगर,कोल्हापूर ह्यांना बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी ३ डिसेंबर रोजी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देत असताना त्या घरात नोकर म्हणून काम करणारा निखील राजू पाटील,वय २५,नवदुर्गा गल्ली,विक्रम नगर,कोल्हापूर ह्याच्यावर पोलिसांना संशय आला.त्याला ताब्यात घेऊन चौकशी करत असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली.त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.त्याच्याकडून ८,७५,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे,सहा.फौजदार समीर शेख,पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत,सत्यजित सावंत,युक्ती ठोंबरे,विशाल शिरगावकर,सुशांत तळप,नितीन बागडी यांनी केली.