-0.8 C
New York
Tuesday, January 14, 2025

Buy now

एसटीच्या विभाग नियंत्रकांकडून कर्मचाऱ्यांना भेटण्यास दिरंगाई

सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी झाले आक्रमक

विभाग नियंत्रकांच्या कार्यालयात उशिरापर्यंत सुरू होती चर्चा

विभागीय कार्यालयाच्या शिफारशीने शयनयान बस गाड्या बंद ? चा ठेवला ठपका

कणकवली : काही महिन्यांपूर्वी तळेरे येथे विजयदुर्ग – पणजी बस चा अपघात झाला होता. या अपघातात विजयदुर्ग आगाराचे चालक नासिर अहमद पठाण यांना मार्गबंद करण्यात आले होते. दरम्यान याबाबत त्यांना २९ नोव्हेंबर, ५ डिसेंबर आणि ७ डिसेंबर रोजी सुनावणी करिता बोलविण्यात आले होते. दरम्यान देण्यात आलेली प्रत्येक तारखांना चालक नासिर अहमद पठाण हे उपस्थित राहिले. परंतु सुनावणी घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडून चालढकल करण्यात आली. असे असताना झालेला त्रास सहन करत चालक नासिर अहमद पठाण हे देण्यात आलेल्या तारखांना उपस्थित राहिले मात्र त्यांची सुनावणी काही झालीच नाही. दरम्यान ७ डिसेंबर रोजी चालक पठाण हे शनिवारी सकाळी ८:३० वाजाता सुनावणीसाठी उपस्थित राहिले. मात्र एसटीच्या विभागीय कार्यालयात कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते. संपूर्ण दिवस भर सुनावणीसाठी आलेले चालक पठाण हे अधिकाऱ्यांची वाट पाहत विभागीय कार्यालयाच्या बाहेर राहिले. मात्र त्यांना कोणीही अधिकऱ्यांबाबत कल्पना दिली नाही.
अखेर चालक पठाण यांनी आपल्याला सुनावणीसाठी बोलावून कशाप्रकारे हेळसांड केली जात आहे याची माहिती सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ चे अशोक राणे यांना दिली. यावेळी शनिवारी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ चे अशोक राणे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत एसटीच्या कणकवली येथील विभागीय कार्यालयात दाखल झाले. मात्र विभाग नियंत्रक कार्यालय हे कुणी वाली नसल्यासारखे होते. अखेर शनिवारी सायंकाळी ५:३० वा. च्या दरम्याने प्रभारी विभाग नियंत्रक विक्रम देशमुख हे कणकवली येथील कार्यालयात आले.
यादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. दरम्यान प्रभारी असलेले विक्रम देशमुख यांनी त्या चालकाला धमकवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या चालकाला सस्पेंड केले आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेले आहे. त्याचप्रमाणे सस्पेंड केलेले असताना देखील त्याला आणखी तीन महिने सस्पेंड करेन किंवा कायमस्वरूपी काढू त्याचे अधिकार आम्हाला आहेत. त्यामुळे सुनावणी ला येताना कोणाला घेऊन यायचे नाही अशा शब्दात सुनावले होते. मात्र हे अधिकार प्रभारी विभाग नियंत्रकांना कोणी दिले? मालवणच्या चालकाची सुनावणी कणकवली विभागीय कार्यालयात होणार असे असताना आम्हाला टाळण्यासाठी तुम्ही मालवण ला गेलात. असा ठपका ठेवत अशोक राणे यांनी प्रभारी विभाग नियंत्रक विक्रम देशमुख यांना खडेबोल सुनावले. यावेळी वातावरण काहिसे तणावपूर्ण बनले होते. यावेळी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास तुमचे हे प्रकार सुरू आहेत असा ठपका देखील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवला.
काही वेळाने चर्चा झाल्यानंतर प्रभारी विभाग नियंत्रक विक्रम देशमुख यांनी झालेल्या चुकीची सर्व प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर सामान्य प्रवाशांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी अशोक राणे, भरत सीताराम चव्हाण, प्रसाद भगत विभागीय उपसचिव, स्वप्नील रजपूत, मनोज पवार कणकवली आगार अध्यक्ष, प्रकाश वालावलकर कणकवली आगार सचिव, एस वाय परब, मनोहर दाभोलकर वेंगुर्ले आगार, सुयोग तांबे तसेच एसटीचे प्रभारी विभाग नियंत्रक विक्रम देशमुख, प्रमोद यादव, लेखाधिकारी श्रीम. दळवी, श्रीम.क्षमा नाडकर्णी यांच्यासह अन्य अधिकरी कर्मचारी उपस्थित होते.

विभागीय कार्यालयाच्या शिफारशीने शयनयान बस गाड्या बंद ? 

काही महिन्यांपूर्वी एसटी च्या ताफ्यात शयनयान बस गाड्या दाखल झाल्या होत्या. प्रवासी वर्गातून देखील या बस गाड्यांना मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र याच विभागीय कार्यालयच्या शिफारशीने सदरच्या बस गाड्या दुसऱ्या विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या, अशी खळबळजनक माहिती देखील यावेळी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ च्या पदाधिकाऱ्यांनी उघड केली. त्या एसटी बस सुरू करण्याबाबत प्रवासी वर्गातून अनेकदा मागण्या झाल्या मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. मात्र याबाबत आम्ही आमच्या नेत्यांचे लक्ष देखील वेधणार असल्याचे अशोक राणे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!