-1.5 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

अखेर ब्लड कॅन्सर शी झुंज देणाऱ्या चिमुकलीला मदत मिळण्यास सुरुवात

कणकवली येथील गौरव अप्पीशेठ गवाणकर मित्र मंडळाच्यावतीने आर्थिक मदतीचा हात पुढे

समाजातील जागरूक नागरिकांनी देखील मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन

कणकवली | मयुर ठाकूर : मालवण तालुक्यातील आचरा येथील परिस्थितीने गरीब, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा चालवणाऱ्या चंद्रशेखर बाबुराव शेळके यांच्या अवघ्या तीन वर्षाची चिमुरडी काव्या चंद्रशेखर शेळके हिला ब्लड कॅन्सर या आजाराचे निदान झाले. काव्याची अचानक प्रकृती खालवल्याने स्थानिक खाजगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. उपचारला साथ मिळत नसल्याने तिला गोवा – बांबूळी येथे हलविण्यात आले. तपासणी दरम्यान तिला ब्लड कॅन्सर झाला असल्याचे निष्पन्न झाले. आपल्या चिमुकल्या मुलीला ब्लड कॅन्सर झाल्याचे ऐकून शेळके कुटुंबाच्या पायाखालची वाळूच सरकली. चंद्रशेखर शेळके हे मोल मजुरी करून कुटुंब चालवत असल्याने सर्व कुटुंब हे त्यांच्यावर अवलंबून होते. अशा वेळी मुलीवर ओढवलेल्या प्रसंगामुळे पूर्णतः कोलमडून गेले आहेत. काव्यावर उपचार हे हॉस्पिटलकडून होणार असले तरी हॉस्पिटल बाहेरील लागणारी महागडी इंजेक्शन, गोळ्या, औषधे हे त्यांच्या आवाक्याबाहेरील आहेत. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या, आपल्या कुटुंबासाठी अनेक स्वप्ने पाहिलेल्या चंद्रशेखर शेळके यांच्या मुलीवर ओढवलेला प्रसंग, आणि आपल्या लाडक्या लेकीसाठी होत असलेली बापाची घालमेल खरंच मन हेलावणारी आहे. काव्यावर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल बांबूळी गोवा येथे उपचार सुरु आहेत. पुढील सात ते आठ महिने गोवा येथे थांबून उपचार घेण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.
काव्यावरील महागडे उपचार आणि तेथील राहण्याचा खर्च हे मोलमजुरी करणाऱ्या शेळके कुटुंबाला शक्य नाहीत. सुरुवातीला होणारा खर्च आचरा येथील समर्थ नगर येथील स्थानिकांनी निधी गोळा करत केला. काव्या हिच्यावरील दीर्घ उपचारासाठी गोवा येथे राहणे आवश्यक आहे. असे असताना शेळके कुटूंबाचे कोणतेही नातेवाईक त्या भागात नसल्याने त्याना जागा भाड्याने घेऊन राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. उपचारासाठी आणि राहण्याची सोय होण्यासाठी आर्थिक मदत उभी राहणे आवश्यक आहे.

याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्त प्रसारित करण्यात आली होती. त्याच माध्यमातून आपल्या परीने जमेल तशी मदत देखील आता तिला होण्यास सुरू झाली असून, कणकवली तालुक्यातील गौरव अप्पीशेठ गवाणकर मित्रमंडळ कणकवली च्या वतीने मदतीचा पहिला हात पुढे करण्यात आला असून रोख रक्कम ३५,००० तसेच जीवनावश्यक वस्तू गोवा येथील रुग्णालयात जाऊन देण्यात आल्या. यावेळी गौरव गवाणकर, मिंगेल मंतेरो, महेश नार्वेकर, आनंद पारकर, जय शेट्ये, रवी बाणे, संजय पारकर, भालचंद्र नार्वेकर, उपस्थित होते. यावेळी गौरव अप्पीशेठ गवाणकर मित्र मंडळाच्या वतीने समाजातील इतर नागरिकांनी देखील या चिमुकलीच्या उपचारासाठी एक हात मदतीचा पुढे करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मदतीसाठी अधिक माहिती पुढीलप्रमाणे

▪️ बँक तपशील
▪️नाव – चंद्रशेखर बाबुराव शेळके
▪️बँकेचे नाव – बँक ऑफ इंडिया
▪️शाखा – आचरा ( IFSC कोड – BKID0001472
▪️खाते क्रमांक – 147210110005241
▪️गुगल पे क्रमांक : चंद्रशेखर शेळके – 9420822659

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!