-1.5 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

शिक्षकांच्या बदल्यांचे वेळापत्रक जाहीर

कणकवली : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. या बदल्यांसाठी १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये कार्यवाही करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यासाठी १ जानेवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी आहे. माहिती निश्चितीसाठी १ ते ३१ मार्च कालावधी असणार आहे. टप्पा १ मध्ये समानीकरणांतर्गत रिक्तपदे निश्चित करण्याची कार्यवाही २१ ते २७ एप्रिल २०२५, टप्पा क्र. २ विशेष संवर्ग शिक्षक भाग १ च्या शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंती क्रम भरण्यास वेळ देणे व बदल्या करणे यासाठी २८ एप्रिल ते ३ मे, टप्पा क्र. ३ मध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग २ च्या शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करण्यासाठी ४ ते ९ मे २०२५, टप्पा क्र. ४ मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करण्यासाठी १० ते १५ मे २०२५, टप्पा क्र. ५ मध्ये बदलीस पात्र शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे व त्यांच्या बदल्या करण्यासाठी १६ ते २१ मे २०२५, टप्पा क्र. ६ मध्ये विस्थापित शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, २२ ते २७ मे, तर टप्पा क्र. ७ मध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी २८ ते ३१ मे २०२५ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!